logo

नांदुरा : रेल्वे स्थानकावर , तीन , लाखाचा गांजा , जप्त !

वसीम शेख ( AIMA news )बुलढाणा

नांदुरा :- रेल्वे स्टेशन नांदुरा तालुका नांदुरा येथे शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी सात वाजे दरम्यान
१२८४३ अप अहमदाबाद पुरी एक्सप्रेस नांदुरा रेल्वे स्थानकावर अंधाराचा फायदा घेऊन पोहोचण्या आधीच चालू गाडीतून अज्ञात आरोपीने आपल्या ताब्यातील गांजा खांब नंबर ५२२ /३१ ३३ जवळ फेकून दिला. संध्याकाळची वेळ असल्यामुळे प्रवासी वर्गामध्ये काही काळ तारांबळ उडाली होती . त्वरित ही माहिती नांदुरा सीआरपीएफ यांना कळविण्यात आली असता घटना स्थळावरती सी आर पीएफ चे सहकारी यांनी उच्च प्रतीचा गांजा वजन तीन बॅग ३४.८९ किलो ग्रॅम
एकूण ३४१५०० रुपये किमतीचा गांजा ताब्यात घेण्यात आला ही कारवाई मगर साहेब ,पीएसआय सुनील कवळकार ,गजानन मेटांगे जगदीश ठाकूर ,आरपीएफ सोनवणे साहेब आर पी एफ ढगे
नांदुरा तहसीलदार मुकुंदे .साहेब यांनी ही कारवाई आज रविवार २१ एप्रिल रोजी केली.असून पुढील तपास नांदुरा सीआरपीएफ करीत आहे.

8
1706 views